इचलकरंजीत शनिवारी राज्य सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:05+5:302021-07-16T04:17:05+5:30
इचलकरंजी : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. तसेच ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना ...
इचलकरंजी : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. तसेच ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक करून नजरकैद केले आहे, याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने शनिवारी (दि. १७) इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहिती विहिंपचे जिल्हा मंत्री शिवप्रसाद व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, लग्न समारंभ, सरकारी कार्यक्रम यांना परवानगी दिली आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारकरी परंपरा ठाकरे सरकारने मोडून काढली. त्यामुळे या सरकारचा किशोर मोदी यांनी निषेध व्यक्त केला. पंढरपूर व गोकुळच्या निवडणुका चालतात; पण वारी चालत नाही. या सरकारमध्ये निर्णयक्षमता नसून, प्रत्येक वेळी हिंदूंवर अन्याय करीत असल्याचे पंढरीनाथ ठाणेकर म्हणाले. विहिंपने छेडलेल्या या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेस संतोष हत्तीकर, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.