इचलकरंजीत 'त्या' नवरीच्या आणखी एका नातेवाईकाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:10+5:302021-02-23T04:39:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात घोरपडे नाट्यगृह परिसरातील 'त्या' नवरीच्या नातेवाईकातील आणखी एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात घोरपडे नाट्यगृह परिसरातील 'त्या' नवरीच्या नातेवाईकातील आणखी एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे.
शहरात दुसऱ्या कोरोना लाटेत पॉझिटिव्ह आलेल्या घोरपडे नाट्यगृह परिसरातील व्यक्तीच्या संबंधित तीन व्यक्ती तसेच आवळे गल्ली परिसरातील एकजण व बीजेपी मार्केटमधील एकजण असे पाचजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. बीजेपी मार्केट परिसरही प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. आजतागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ३५, तर एकूण मृत्यू संख्या १९४ आहे. आतापर्यंत ३ हजार ८३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. २६) नाट्यगृहात आयोजित केलेली नगरपालिकेची सभाही परिसर सील केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अन्यत्र घेण्यात येणार आहे. तसेच दिवसभर शहरात राबविण्यात आलेल्या विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईच्या मोहिमेत १३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केले आहे.
फोटो ओळी
२२०२२०१-आयसीएच-०५
घोरपडे नाट्यगृह परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून पत्रे मारून भाग सील करण्यात आला.
छाया-उत्तम पाटील