इचलकरंजीत शॉर्टसर्किटने सायझिंगला आग ; लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 06:16 PM2021-03-25T18:16:18+5:302021-03-25T18:20:43+5:30
Fire ichlkarnji kolhapur- इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये शिव-गंगा सायझिंगला शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये मशीनरी, सूत जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी पाणी मारून तासाभराच्या परिश्रमाने ही आग विझवली.
इचलकरंजी : येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये शिव-गंगा सायझिंगला शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये मशीनरी, सूत जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी पाणी मारून तासाभराच्या परिश्रमाने ही आग विझवली.
औद्योगिक वसाहतीमध्ये धनंजय पाटील यांच्या मालकीचे शिव-गंगा सायझिंग आहे. तेथे कापडावर प्रक्रिया केली जाते. या सायझिंगला गुरूवारी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली. त्यामध्ये सायझिंग मशीनरी, वार्पिंग रोल, सुताचे बिम जळून खाक झाले.
आग लागल्याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी पाण्याचा फवारा मारत आग विझवली. औद्योगिक वसाहतीमधील अन्य उद्योजकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.