इचलकरंजीत आठवडी बाजार बंद; आणखी एक कोविड केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:38+5:302021-04-22T04:25:38+5:30

दुसऱ्या लाटेत शहरासह परिसरातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना व सुविधांची उपलब्धता करण्यासंदर्भात बुधवारी नगरपालिकेच्या ...

Ichalkaranji weekly market closed; Another covid center | इचलकरंजीत आठवडी बाजार बंद; आणखी एक कोविड केंद्र

इचलकरंजीत आठवडी बाजार बंद; आणखी एक कोविड केंद्र

googlenewsNext

दुसऱ्या लाटेत शहरासह परिसरातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना व सुविधांची उपलब्धता करण्यासंदर्भात बुधवारी नगरपालिकेच्या सभागृहात समितीची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला ‘आयजीएम’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांनी रुग्णालयातील सद्य:स्थितीची माहिती दिली. तसेच शहरात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या एक लाख ५ हजार इतकी असून, आजअखेर ३० हजार जणांनी लस घेतली असल्याचे सांगितले.

प्रत्येक शंभर व्यक्तीमागे १५ जण पॉझिटिव्ह येत असल्याने पुढील तरतूद म्हणून तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे १२० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यंकटेश्वरा केंद्रात सध्या १७६ बेड असून, त्यामध्ये १२ ऑक्सिजन बेड आहेत. तेथे सध्या १३९ रुग्ण दाखल आहेत. त्याची क्षमता २२५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. भाजीपाला विक्रीसाठी आठवडी बाजार बंद राहणार असून, पालिकेच्या नियोजित जागेवर पट्टे आखून देण्यात येणार आहेत. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची रस्त्यातच तपासणी केली जाणार आहे, आदी निर्णय घेण्यात आले. बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक राहुल खंजिरे, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश मोरबाळे, उपमुख्याधिकारी केतन गुजर, विश्वास हेगडे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२१०४२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजी शहर सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, रविकुमार शेट्ये, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Ichalkaranji weekly market closed; Another covid center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.