इचलकरंजीला नियमित पाणीपुरवठा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:53+5:302021-01-04T04:21:53+5:30
पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या योजना मंजूर केल्या. ...
पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या योजना मंजूर केल्या. त्यासाठी २५.५० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यावर्षीपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. ऐन उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चोपडे यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणार असून, या कालावधीत शहराला भविष्यात पाणीपुरवठा कमी पडू नये, अशी तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. चोपडे म्हणाले, कृष्णा व पंचगंगा योजनेतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहराला तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये सुधारणा करून वर्षभरात एक दिवसाआड पाणी देण्यात यशस्वी झालो. तसेच एक वर्षाच्या कालावधीत अनधिकृत नळजोडणी देण्यात आलेली नसून, नागरिकांना शंभर रुपयांमध्ये नळजोडणी देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे नगरपालिकेचेही यामध्ये नुकसान होणार नाही.
दरम्यान, शहरामध्ये असलेल्या पाणी टाक्यांवर अतिरिक्त भार असल्याने आणखीन चार नवीन टाक्या बांधण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला आहे. १५ व्या वित्त आयोगातून साईट क्रमांक १०२ येथे नवीन टाकी बांधण्यात येणार असून, या महिनाअखेर दोन्ही जलकुंभांचे बांधकाम सुरू होईल. तसेच प्रांत कार्यालयाजवळील पाण्याची टाकी मुदतबाह्य झाल्याने ती पाडून नवीन टाकी बांधण्यात येणार आहे. या सर्व कालावधीत खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे, सुनील पाटील, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, उदयसिंह पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे चोपडे यांनी सांगितले.