इचलकरंजीतील युवक जागीच ठार

By admin | Published: October 25, 2015 12:53 AM2015-10-25T00:53:14+5:302015-10-25T01:08:29+5:30

मोटारसायकल बसखाली सापडून दुर्घटना

Ichalkaranji youth killed on the spot | इचलकरंजीतील युवक जागीच ठार

इचलकरंजीतील युवक जागीच ठार

Next

इचलकरंजी : येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर मोटारसायकल घसरून एस.टी.बसच्या पाठीमागील चाकाखाली पडल्याने मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला. प्रवीण
राजेंद्र दोशी (वय २२, रा. श्रीपादनगर) असे त्याचे नाव आहे.
टेलिफोन आॅफिसजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांतून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रवीण हा शिवाजी पुतळ्याकडून संभाजी चौकाच्या दिशेने मोटारसायकल (एमएच 0९ सीवाय १२१७) वरून जात होता. याचवेळी कर्नाटक आगाराची एसटी बस (केए २३ एफ ५२८)
घेऊन चालक एस. आर. हेंद्रे चिकोडीला जात होते. टेलिफोन आॅफिसजवळ एसटी बस मोटारसायकलला ओव्हरटेक करून पुढे जात असताना प्रवीण याने मोटारसायकल रस्त्याकडेला घेतली. त्याठिकाणी रस्त्यावर बारीक खडी पसरली होती. ब्रेक दाबल्याने मोटारसायकल घसरली आणि प्रवीण खाली पडला. तो एसटीच्या मागील चाकाजवळच पडला. त्यामुळे एसटीचे मागील चाक
त्याच्या डोक्याला जोराने
धडकले. त्यात त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. एसटीचालकास धडक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने एसटी बस थांबवून तेथून पलायन केले.
घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळाचे मोबाईलवर चित्रीकरण आणि छायाचित्र घेण्यासाठी तरुणांची घाईगडबड सुरू होती. त्यामुळे पोलिसांना पंचनामा करताना अडथळा होत होता.
त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. मात्र, तरीही जमाव वारंवार गर्दी करीत होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोशी याच्या नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती.
त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व आई-वडिल असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Ichalkaranji youth killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.