सीए फाऊंडेशन परीक्षेत इचलकरंजीची निधी ललवाणी देशात पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:55+5:302021-02-09T04:27:55+5:30
कॉमर्स, फायनान्स हे माझे आवडते क्षेत्र आहे. त्यामुळे त्यातील सीए अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात करिअर करण्याचा मी निर्णय ...
कॉमर्स, फायनान्स हे माझे आवडते क्षेत्र आहे. त्यामुळे त्यातील सीए अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात करिअर करण्याचा मी निर्णय घेतला. त्याला आई, वडील, आजी, भाऊ अक्षय आदी कुटुंबीय, शिक्षकांनी पाठबळ दिले. सीए अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा असलेल्या फाऊंडेशनमध्ये देशात पहिल्या क्रमांकाने यश मिळविल्याचा खूप आनंद होत आहे.‘आऊट ऑफ द वर्ल्ड‘ असे वाटत आहे.
- निधी ललवाणी
प्रतिक्रिया
माझे शिक्षक विजय सालडा यांच्या जीवनप्रवासातून मला सीए होण्याची प्रेरणा मिळाली. इंटरमेडियेट परीक्षेपूर्वी एक महिना आधी मी कोरोनाबाधित झालो. त्यातून बरा झाल्याने परीक्षेची तयारी केली. पहिला पेपर अवघड गेल्याने पुढे परीक्षा देऊ नये, असे वाटले. पण, कुटुंबीय, शिक्षकांनी पाठबळ दिल्याने परीक्षा दिली आणि यशस्वी झालो. त्याचा खूप आनंद होत आहे.
- सिध्दांत मेहता.
फोटो (०८०२२०२१- कोल-निधी ललवाणी (सीए एक्झाम), सिध्दांत मेहता (सीए एक्झाम), हर्षल शाह (सीए एक्झाम), कल्पेश पाटील (सीए एक्झाम), श्रेयस दळवी (सीए एक्झाम), सागर पटेल (सीए एक्झाम)
फोटो (०८०२२०२१-कोल-निधी ललवाणी (सीए एक्झाम) ०१ : सीए अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन परीक्षेत सोमवारी इचलकरंजीतील निधी ललवाणी हिने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल आजी सरस्वती यांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले. यावेळी शेजारी आई विमला, वडील दिनेशकुमार उपस्थित होते.