इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:04 PM2018-10-16T13:04:17+5:302018-10-16T13:05:12+5:30
इचलकरंजी येथील जहागिरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले. ते श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे चिरंजीव होत.
इचलकरंजी: येथील जहागिरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले. ते श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे चिरंजीव होत.
आबासाहेब यांचे शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान होते. डी.के.टी.ई. शैक्षणिक संस्थेला राजवाडा देऊन त्यांनी उदात्तेचा वस्तूपाठ घालून दिला.
त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते. गेले कांही दिवस त्यांची प्रक्रुती अस्वस्थ होती. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
नारो महादेव जोशी हे मूळचे कोकणचे होते. लहानपणी वडील वारल्याने ते आईसह आजरा संस्थानात आले. त्यांना युद्धाची आवड म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सेवेत दाखल झाले. युद्धात कर्तबगारी दाखवल्याने संताजींनी त्यांना इचलकरंजीची जहागिरी बहाल केली. त्यांनीही मग स्वामिनिष्ठ म्हणून जोशी नावाचा त्याग करून घोरपडे हे नाव स्वीकारले.
नारायणराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांनी आधुनिक इचलकरंजीचा पाया रचला. लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या सहवासात ते असत. आबासाहेबांनी विठ्ठलराव दातार यांना १९०४ साली इचलकरंजीत पहिला यंत्रमाग आणण्यास प्रोत्साहन दिले आणि पुढे ही वस्त्रनगरी बनली. गोविंदराव यांनी ही परंपरा आपल्या परीने पुढे नेली.