इचलकरंजीत आज ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:08+5:302021-07-12T04:17:08+5:30
अत्यावश्यक सेवांसह इतर व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार शेट्टी व पोलीस प्रशासन यांची शुक्रवारी ...
अत्यावश्यक सेवांसह इतर व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार शेट्टी व पोलीस प्रशासन यांची शुक्रवारी (दि. ९) बैठक पार पडली होती. त्या बैठकीनंतर रविवारपर्यंत व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्याचा आदेश न मिळाल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हचा दर जिल्ह्यामध्ये कमी येत नसल्याने आमदार आवाडे यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय सायंकाळी घेतला. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत शेट्टी यांनी कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून ते व्यापाऱ्यांची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
चौकटी
सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता
व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीला सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सशी चर्चा करून सायंकाळी पाच वाजता पुढील निर्णय घेणार असल्याचे इनामप्रणीत व्यापारी असोसिएशनने सांगितले.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
दुकाने सुरू करण्यासंदर्भात अजूनही कोणताच आदेश आलेला नाही. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी पोलीस प्रशासनाने मुख्य मार्गावरून फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.