मोबाईल चोरीप्रकरणी इचलकरंजीचे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:53+5:302021-07-21T04:17:53+5:30
शिरोळ : हरोली (ता. शिरोळ) येथे मोबाईल चोरी प्रकरणातील दोघा संशयितांना शिरोळ पोलिसांनी अटक केली. तेजस कृष्णा सुतार (वय ...
शिरोळ : हरोली (ता. शिरोळ) येथे मोबाईल चोरी प्रकरणातील दोघा संशयितांना शिरोळ पोलिसांनी अटक केली. तेजस कृष्णा सुतार (वय १९, रा. अयोध्यानगर, खोतवाडी, ता. हातकणंगले) व ओंकार रवींद्र बीचकर (वय २१, रा. साईट नं. १०२, आसरानगर, इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६८ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितांना मंगळवारी जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार चंद्रकांत केरबा माने (वय ३७, रा. हरोली) हे ४ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हरोली गावचे हद्दीतील रस्त्यावरून जात होती. त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलीवरून दोन अज्ञातांनी येऊन माने यांच्या हातातील मोबाईल हिसडा मारून नेला होता. याप्रकरणी माने यांनी शिरोळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
शिरोळ पोलिसांच्या तपासानंतर संशयितांना सापळा रचून चौंडेश्वरी फाटा परिसरातून ताब्यात घेतले. या वेळी कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल संच असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सूळ, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, सुनील पाटील, ताहीर मुल्ला, अभिजित परब यांच्या पथकाने केली.
फोटो - २००७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ पोलिसांनी दोघा मोबाईल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.