इचलकरंजीच्या महिलेचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:54 PM2018-08-12T23:54:57+5:302018-08-12T23:55:02+5:30

Ichalkaranji's woman suffocated with blood | इचलकरंजीच्या महिलेचा गळा दाबून खून

इचलकरंजीच्या महिलेचा गळा दाबून खून

Next

इचलकरंजी / कुरुंदवाड/ पणजी : इचलकरंजी-बोरगांव रस्त्यावर कर्नाटक हद्दीत एका महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. थोरात चौक, इचलकरंजी. मूळ रा. कवठेमहांकाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच तिचा खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी सदलगा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, मोबाईलच्या लोकेशनवरुन तिचा पती दिनेश हा गोवा येथे असल्याची माहिती सदलगा पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छायाचित्रासह दिनेशची माहिती दिल्यावर पणजी पोलिसांनी त्याला मिरामार येथे अटक केली. कर्नाटक पोलीस गोव्यात येवून संशयिताला घेऊन जातील, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील थोरात चौकातराहणाऱ्या दिनेश पाटील याचा कवठेमहांकाळच्या दिशा यांच्याबरोबर बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. घरगुती वाद-विवादामुळे दिशा व दिनेश हे दिनेशच्या आई-वडिलांपासून विभक्त राहत होते. त्यांचा कागद विक्रीचा व्यवसाय आहे तसेच दिनेश हा सुताचाही व्यवसाय करतो. या दोघांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद-विवाद झाला होता. त्या वादातून दिशा जयसिंगपूर येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. शनिवारी (दि. ११) दिनेशने जयसिंगपूरला जाऊन तेथे चर्चा केली होती तसेच समजूत काढून दिशाला सोबत घेत सांगलीतील एका पाहुण्यांना भेटून सगळे काही मिटल्याचे सांगून आनंदाने बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोघेही इचलकरंजीतील घरी पोहोचलेच नाहीत.
दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास बोरगाव रस्त्यावर गळा दाबून खून केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. अधिक तपास केला असता हा मृतदेह दिशा यांचा असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डी. टी. प्रभू, पोलीस निरीक्षक एम. एस. नायकर, संगमेश दिडगीनहाळ यांनी भेट दिली. घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर चिकोडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदलगा पोलीस ठाणे तसेच थोरात चौकातील घराजवळ नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती.
कवठेमहांकाळच्या कोठावळे कुटुंबीयांना धक्का
कवठेमहांकाळ : दिशा यांचे माहेरचे आडनाव कोठावळे आहे. दिशाला दोन विवाहित बहिणी आहेत. एक भाऊ दोन वर्षापूर्वी अपघातात ठार झाला आहे. त्यामुळे दिशाच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता.
या धक्क्यातून सावरतानाच त्यांना मुलीच्या खुनामुळे दुसरा
धक्का बसला आहे. दोन वर्षांत घडलेल्या या दोन घटनांनी हे
कुटुंब हादरून गेले आहे. दिशाचे वडील आण्णासाहेब कोठावळे
यांना दूरध्वनीवरून खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Ichalkaranji's woman suffocated with blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.