इचलकरंजीची कुस्तीपटू आर्या ठरली महिला सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:10+5:302021-03-19T04:22:10+5:30
इचलकरंजी : श्रीक्षेत्र नेज (ता. चिकोडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त आंतरराज्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये महिला गटात इचलकरंजीतील आर्या विश्वजित ...
इचलकरंजी : श्रीक्षेत्र नेज (ता. चिकोडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त आंतरराज्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये महिला गटात इचलकरंजीतील आर्या विश्वजित नवनाळे (तालीम चंदूर) हिने प्रथम क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या सोनाली चव्हाण हिला लाटणे डावावर चितपट करून अजिंक्यपद पटकावले. तिला महिला सरपंच केसरी किताब, दोन किलो चांदीची गदा आणि रोख रक्कम असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. चांदीची गदा मिळवणारी आर्या ही इचलकरंजी परिसरातील पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. बक्षीस वितरण यात्रा समिती व कुस्ती समितीचे अध्यक्ष अरुण निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बापूसाहेब काळगे, सुरेश यडुरे व अण्णाप्पा चिनुननवरे उपस्थित होते. आर्या हिला पै. सचिन पुजारी, वडील ललित यांचे मार्गदर्शन लाभले. आर्या हिने आजवर डीकेटीई प्रशालेकडून खेळताना विभागीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
फोटो ओळी
१८०३२०२१-आयसीएच-०२
आर्या नवनाळे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस अरुण निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बापूसाहेब काळगे, सुरेश यडुरे व अण्णाप्पा चिनुननवरे उपस्थित होते.