इचलकरंजीत २९ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:25 AM2021-05-10T04:25:05+5:302021-05-10T04:25:05+5:30
इचलकरंजी : येथील विविध २२ भागांतील २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गांधी कॅम्प ...
इचलकरंजी : येथील विविध २२ भागांतील २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गांधी कॅम्प येथील ४५ वर्षीय, सांगली नाका परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, कलानगर येथील ५८ वर्षीय महिला, तर वाल्मीकी सोसायटीमधील ८५ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरदंडे मळा ३, विक्रमनगर, घोडकेनगर, पुजारी मळा, इंदिरा हौसिंग सोसायटी, अवधूतनगरमधील प्रत्येकी दोन, टाकवडे वेस, नदीवेस नाका, झेंडा चौक, लालनगर, आवळे गल्ली, रेंदाळकर मळा, महालक्ष्मीनगर, वर्धमान चौक, लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ, गुरुकन्नननगर, आयजीएम क्वाटर्स, प्रियदर्शनी कॉलनी, स्वामी मळा, जवाहरनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, तेलगू सोसायटी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पाच हजार ५९० जणांना लागण झाली आहे. चार हजार ७६७ जण बरे झाले असून, ५६८ जण उपचार घेत आहेत. मृत्यू संख्या २५५ वर पोहोचली आहे.