इचलकरंजीत ४९ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:25+5:302021-06-04T04:20:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात विविध ३० भागांतील ४९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गावभाग महादेव मंदिरजवळील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात विविध ३० भागांतील ४९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गावभाग महादेव मंदिरजवळील ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहापूर ५, जवाहरनगर ४, शेळके मळा ३, श्रीपादनगर, टाकवडे वेस, खंजिरे मळा, सुतार मळा, बोहरा मार्केटजवळ, आयजीएम रुग्णालयाजवळ, कोले मळा, भारतमाता हौसिंग सोसायटी, इंदिरा हौसिंग सोसायटी, गणेशनगर येथील प्रत्येकी २, पी. बा. पाटील मळा, गावभाग, राजवाडा, रिंगरोड, वेताळ पेठ, शांतीनगर, विक्रमनगर, थोरात चौक, सांगली रोड, कापड मार्केट, नेहरूनगर, संत मळा, बंडगर मळा, गोकूळ चौक, तीन बत्ती, बसस्थानकाजवळ, साईनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ८८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सहा हजार ६१ बरे झाले आहेत. ४७६ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३४९ वर पोहचली आहे.