इचलकरंजीत ९ पॉझिटिव्ह ; एका वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:08+5:302021-04-11T04:24:08+5:30
महिन्याभरापासून शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. शहरातील विविध भागात दररोज कमी-जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. शनिवारी ...
महिन्याभरापासून शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. शहरातील विविध भागात दररोज कमी-जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. शनिवारी प्राप्त अहवालात शहापूर परिसरात २ तर बोहरा मार्केट, आवाडे अपार्टमेंट, आयजीएम हॉस्पिटल परिसर, म्हेतर गल्ली, कापड मार्केट अपार्टमेंट, हत्ती चौक व आदर्श कॉलनी भागात प्रत्येकी १ अशा ९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची आजअखेरची संख्या ४३१५ इतकी झाली आहे. तर सध्या १४३ जणांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर ३९७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ वर पोहोचली आहे.