इचलकरंजीत बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:50+5:302021-02-27T04:32:50+5:30
इचलकरंजी : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी अॅक्टमधील अडचणीच्या तरतुदीविरोधात शुक्रवारी शहरातील छोटे व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून ...
इचलकरंजी : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी अॅक्टमधील अडचणीच्या तरतुदीविरोधात शुक्रवारी शहरातील छोटे व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, इचलकरंजी शहर किरकोळ किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन दिले.
भारत व्यापार बंद व देशव्यापी चक्का जामची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जीएसटी करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची असून, त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात महावीर शिरगुप्पे, संतोष पाटील, संजय वठारे, जितेश हुक्केरी, सुभाष तनंगे, मोहन भोसले, उत्तम डोणे, किशोर जगदेव, चंद्रकांत कसलकर, संकेत बरगाले आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
२६०२२०२१-आयसीएच-०२
जीएसटी करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची असून, त्यामध्ये सुधारणा करावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर किरकोळ किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.