इचलकरंजीत हाळवणकर यांच्या ई-माहिती, तक्रार केंद्राचे उद्घाटन

By admin | Published: December 26, 2014 12:28 AM2014-12-26T00:28:27+5:302014-12-26T00:46:19+5:30

राज्यातील पहिला उपक्रम : तक्रारी मिस कॉलद्वारे करण्याचे आवाहन

Ichalkaranjit Halvankar's e-Info, Grievance Center inaugurated | इचलकरंजीत हाळवणकर यांच्या ई-माहिती, तक्रार केंद्राचे उद्घाटन

इचलकरंजीत हाळवणकर यांच्या ई-माहिती, तक्रार केंद्राचे उद्घाटन

Next

इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या तक्रारी व सूचना थेट आमदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-माहिती व तक्रार केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन आमदार हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास रानडे होते. या योजनेचा मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हाळवणकर यांनी केले.
ई-माहिती व तक्रार केंद्रात आपली तक्रार किंवा माहिती नोंदविण्यासाठी नागरिकांनी ०४०७१०१५१५५ या क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. त्यानंतर या प्रणालीद्वारे आपणास एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर त्या एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आपल्या शहर-गावाचे नाव, आपले नाव, पत्ता व थोडक्यात तक्रार पाठवायची आहे. त्यानंतर आमदार कार्यालयातून संबंधित तक्रारदारास दूरध्वनीद्वारे विचारणा केली जाईल आणि त्यानुसार तक्रार निवारण करून त्यानंतर पुन्हा एसएमएसद्वारे तक्रारदारास त्यांच्या तक्रारीसंदर्भातील पूर्ततेची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी आॅनलाईन सोडवून घ्याव्यात, असे आवाहन हाळवणकर यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांनी या योजनेबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांच्या तक्रारी, अडचणी व सूचना समजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ती सर्व मदत आमदार कार्यालयामार्फत केली जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदी निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या संपर्कात राहून लोकाभिमुख कामे करावीत. तसेच आठवड्यातून एक दिवस एक ते दोन तास स्वच्छता अभियानासाठी देऊन आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहनही हाळवणकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमास हिंदुराव शेळके, धोंडिराम जावळे, गोपाल जासू, प्रवीण खामकर, शहाजी भोसले, मदन झोरे, आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बुथ प्रतिनिधी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranjit Halvankar's e-Info, Grievance Center inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.