इचलकरंजीत कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:58 AM2018-07-02T00:58:31+5:302018-07-02T00:58:40+5:30

Ichalkaranjita Kamgarara murder | इचलकरंजीत कामगाराचा खून

इचलकरंजीत कामगाराचा खून

Next


इचलकरंजी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त मित्रांनी येथील वहिफणी कामगाराचा खून केला. विजय जनार्दन सरदेसाई (वय २७, रा. स्वामी मळा, जवाहरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रजाक शेख व इस्माईल शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, जवाहरनगरमधील स्वामी मळा याठिकाणी राहणारा विजय सरदेसाई हा त्याचा मित्र रजाक शेख याच्याबरोबर देशी दारू दुकानात शनिवारी (दि. ३०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारू पित बसला होता. त्यांनी इस्माईल शेख या मित्राला देखील दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी बोलावले. इस्माईल आल्यानंतर दारू पिण्यासाठी विजयने पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिघेही इस्माईलच्या मोटारसायकलवरून कबनूर येथील फरांडे मळा येथे आले. दारूला पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या रजाक व इस्माईल यांनी विजयला शिवीगाळ करत मारहाण केली.
विजयने त्यांना विरोध करताच इस्माईलने हात धरला व रजाकने त्याच्या डोक्यात दगड घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे विजय जमिनीवर निपचित पडला. ते पाहून भयभीत झालेले इस्माईल व रजाक दोघेही तेथून पळाले. दोघेही रात्री दहा वाजता त्यांच्या घरी गेले. इस्माईल हा विलास कोरवी याच्याकडे गेला. रजाक याने विजयच्या डोक्यात दगड घातल्याचे त्याने त्याला सांगितले. घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून कोरवी याने इस्माईलला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवली आणि रात्री उशिरा जयसिंगपूर येथे रजाक यास अटक केली. या खुनाची कबुली दोघांनीही पोलिसांना दिली आहे.
संशयितांना हाकलले
दारूच्या नशेत खून झाल्यानंतर संशयित आरोपी घाबरून गेले होते. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढत घर गाठले.
घडलेली घटना त्यांनी घरातील नातेवाइकांना सांगितली. मात्र, घरातील लोकांना त्यांनी केलेला प्रकार रूचला नाही. त्यांनी दोघाही आरोपींना घराबाहेर हाकलून दिले.

Web Title: Ichalkaranjita Kamgarara murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.