चिन्ह नोंदणीकृत पक्षांसाठीच
By admin | Published: January 24, 2017 12:33 AM2017-01-24T00:33:33+5:302017-01-24T00:33:33+5:30
दादा, गणित जमलं....!
कोल्हापूर : ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सदस्यसंख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असतील, तर किमान एका जागेवर निवडून आलेल्या राजकीय पक्षास जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना आरक्षित करण्यासाठी अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेले मुक्त चिन्ह त्या नोंदणीकृत पक्षासाठी त्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरक्षित मुक्त चिन्ह असल्याचे घोषित करण्याची तरतूद केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्ष त्यांच्यासाठी राखीव केलेली चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी प्रदान करण्याची तरतूद आहे. मात्र, इतर सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना (ज्यांना निवडणूक आयोगाची मान्यताप्राप्त नाही) प्रत्येक जागेसाठी मुक्त चिन्ह (आवश्यक असेल तर लॉटरी पद्धतीने) प्रदान करण्याची तरतूद आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षाला एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभे केलेल्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप होते. त्यामुळे त्यांना प्रचार करण्यास अडचणी येतात. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, दिनांक ३१ मार्च २००९ (त्यामधील वेळोवेळी सुधारणासह) मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उपविभाग शनिवार दि. २१ जानेवारी २०१७ नुसार राजकीय पक्षांना चिन्ह, आरक्षण निवड व वाटप करणे आणि त्यासंबंधीच्या बाबींविषयी नवीन तरतुदी केल्या आहेत. ज्या पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरक्षित मुक्त चिन्ह घोषित केले आहे, अशा पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास पक्षाकरिता आरक्षित केलेल्या चिन्हाची निवड
त्या निवडणुकीसाठी करता येईल.