‘आयडीबीआय’ला चार कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:50 AM2018-10-30T00:50:29+5:302018-10-30T00:50:34+5:30

कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून क्रशर ...

IDBI gets Rs 4-crore loan | ‘आयडीबीआय’ला चार कोटींचा गंडा

‘आयडीबीआय’ला चार कोटींचा गंडा

googlenewsNext

कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून क्रशर चौकातील आयडीबीआय बँकेच्या शाखेला चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अपहाराची रक्कम बारा कोटींच्या घरात पोहोचली आहे.
या रॅकेटचा म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याच्या चौकशीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या स्थावर मालमत्तेसह नातेवाईकांची चौकशी पोलीस करीत आहेत. पीक कर्जाच्या नावाखाली आयडीबीआयसह अन्य बँकांनाही गंडा घातल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष पाटील याला अटक केली आहे. सध्या पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडून पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यामध्ये त्याने तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे यांना हाताशी धरून क्रशर चौकातील आयडीबीआय बँकेत सुमारे चार कोटींचा अपहार केल्याचे तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती वाढली असून, पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पाटील याने कर्जदारांच्याकडून घेतलेल्या पैशातून स्थावर मालमत्तेसह आणखी काही खरेदी केले आहे काय, याची पोलीस चौकशी करीत आहेत. त्याच्या जवळच्या नतेवाईकांचीही गोपनीय चौकशी सुरू आहे. त्याची सर्व बँकखाती गोठवली आहेत. त्याच्यासह आर. डी. पाटील या दोघांच्या सर्व मालमत्तेवर न्यायालयाच्या आदेशानुसार टाच आणण्यासाठी विधिज्ञांची मदत घेत आहेत.
गंधेच्या माहितीची पडताळणी
बनावट कर्ज प्रकरणे ६00 च्या वरती असल्याने पोलिसांची डोकेदुखी झाली आहे. कर्जाचा लाभ घेतलेल्या ६00 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. प्रत्येक शेतकºयाचा वैयक्तिक जबाब घेतला जात आहे. त्यामध्ये संतोष पाटील याने आमचेकडून कमिशन घेतल्याचे प्रत्येकजण सांगत आहे. बँक व्यवस्थापक, तलाठी, कर्जदार, एजंट यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तत्कालीन व्यवस्थापक गंधे हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे; परंतु त्याने सांगितलेल्या माहितीची पोलीस पडताळणी करीत आहेत. पाटील यानेच गंधे यांचे नाव घेतल्याने ते आरोपींच्या पिंजºयात अडकले आहेत. विधिज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांना अटक करण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: IDBI gets Rs 4-crore loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.