वडगावातील मोफत कोविड सेंटरचा आदर्श घेतला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:07+5:302021-05-27T04:27:07+5:30
पेठवडगाव : कोरोनाबाधित झाल्यामुळे मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. युवकांनी गावांच्या मदतीसाठी मोफत कोविड सेंटर सुरू करून आदर्श ठेवला ...
पेठवडगाव : कोरोनाबाधित झाल्यामुळे मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे.
युवकांनी गावांच्या मदतीसाठी मोफत कोविड सेंटर सुरू करून आदर्श ठेवला आहे. हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अशोक माने यांनी केले.
येथील शेतकरी संघाच्या मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विद्या पोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माने बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, युवकांच्या उत्स्फूर्ततेला सलाम करतो. इतर कोणताही आधार, पाठबळ नसताना त्यांनी मोफत कोविड सुरू केले आहे. यांचे आम्हासारख्या राजकारण्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. अन्य कोणती मदतीसाठी पाठीशी आहे.
नगराध्यक्ष मोहनलाल माळी म्हणाले, सोशल मीडियावर या युवकांनी आवाहन केले होते. त्यांनी नुसते बोलून नाही, तर त्यांनी गावांसाठी करून दाखवले आहे. आदर्शवत काम केले आहे.
प्रास्ताविक सचिन सलगर यांनी केले, तर भूषण विभूते यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केले.
यावेळी डाॅ. आर. ए. पाटील, रमेश शिंपणेकर, विजयसिंह शिंदे, नितीन कुचेकर, महेश भोपळे, राज कोळी, विजय माने, संजय कोठावळे, पियुष सावर्डेकर, पवन पोवार, संजय सूर्यवंशी, सागर भोसले आदी उपस्थित होते.
चौकट : खाऊची भिशीकोविड सेंटरसाठी...!
जय व श्रीवर्धन कुचेकर यांनी खाऊतील साठवलेल्या पैशांची भिशीच कोविड सेंटरला मदत म्हणून यावेळी दिली. यावेळी वडगावातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे.
फोटो ::: पेठवडगाव कोविड विलगीकरण फोटो फोटो कॅप्शन सह पेठवडगाव: येथे छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिर विलगीकरण कक्षाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भूषण विभूते, सचिन सलगर, रमेश शिंपणेकर आदी उपस्थित होते.