घरीच ओळखा दूधभेसळ
By Admin | Published: January 29, 2015 12:32 AM2015-01-29T00:32:11+5:302015-01-29T00:32:23+5:30
संजय पाटील यांनी दाखविली प्रात्यक्षिके
कोल्हापूर : दुधामध्ये विविध पदार्थांची भेसळ राजरोसपणे केली जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्राहकांनी घरच्या घरी दुधातील भेसळ कशी ओळखावी, याची प्रात्यक्षिके राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संजय पाटील यांनी आज, शाहू स्मारक भवन येथे दाखविली.
याबाबत ग्राहकांनी आपल्या घरीच जागरूकतेने भेसळ ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त एस. एन. देशमुख, आर. एस. कोरे, संतोष सावंत उपस्थित होते.
अशी ओळखा भेसळ
दुधातील युरिया - एका टेस्टट्यूबमध्ये ५ मि.लि. दूध घेऊन त्यात ब्रोमोथा मोलचे दोन थेंब टाका, दहा मिनिटांत मिश्रणाला निळा रंग आला तर युरिया भेसळ झाल्याचे स्पष्ट होते.
दुधात पाणी - दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागाला लावला तर शुद्ध दूध तेथेच ठिपल्याप्रमाणे राहते किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. पाणीमिश्रित दूध ताबडतोब खाली ओघळते.
दुधात स्टार्च - दुधात २-३ थेंब टिंक्चर आयोडिन टाकल्यावर निळा रंग आल्यास भेसळ समजावी.