पदवीधर, शिक्षक मतदारांसाठी ओळखपत्र आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 11:44 AM2020-11-30T11:44:00+5:302020-11-30T11:46:10+5:30
Vidhan Parishad Election, pune, kolhapurnews, teacher, collcatoroffice पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त काही कागदपत्रे आयोगाच्या निर्देशानुसार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त काही कागदपत्रे आयोगाच्या निर्देशानुसार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य, केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खासगी उद्योगसमूहांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांना निर्गमित केलेली अधिकृत ओळखपत्र, पदवीधर, शिक्षक मतदार संघामधील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना संबंधित संस्थांनी निर्गमित केलेले ओळखपत्र, विद्यापीठाने निर्गमित केलेले पदवी, पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने निर्देश दिले आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.