‘स्व’ची ओळख हेच उत्तुंग करिअर अविनाश धर्माधिकारी : विवेकानंद महाविद्यालयात गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:35 PM2017-12-23T23:35:21+5:302017-12-23T23:37:14+5:30

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात.

The identity of 'Self' is same as Avinash Dharmadhikari: Vivekananda College's Honorable Student Gala ceremony | ‘स्व’ची ओळख हेच उत्तुंग करिअर अविनाश धर्माधिकारी : विवेकानंद महाविद्यालयात गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

‘स्व’ची ओळख हेच उत्तुंग करिअर अविनाश धर्माधिकारी : विवेकानंद महाविद्यालयात गुणी विद्यार्थी गौरव समारंभ

Next

कोल्हापूर : पुस्तकी ज्ञानाला आपण अकॅडेमिक करिअर म्हणतो. यापलीकडे खेळ, कला व जीवन घडविणारी कौशल्येही असतात. जीवनाची इमारत आपल्याला काय येते, यावरच उभी असते. पुस्तकी ज्ञानापलीकडेही जीवन घडविण्याच्या अनेक संधी असतात. त्यांचा शोध माणसाने घेतला पाहिजे. ‘स्व’ची ओळख होणे म्हणजे उत्तुंग करिअर घडविणे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

विवेकानंद कॉलेजच्या गुणी गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्याध्यक्ष साळुंखे म्हणाले, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभावनेतून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व जीवनाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे.विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या मार्च २०१७ मध्ये झालेल्या बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग, एन.सी.सी., एन.एस.एस.मधील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाने व विविध मान्यवरांनी घोषित केलेल्या बक्षिसांची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी सांस्कृतिक विभागातर्फे विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. डी. सी. कांबळे व त्यांच्या सहकाºयांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे संयोजन प्राचार्य नियुक्त प्रतिनिधी डॉ. डी. बी. पाटील, जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. स्वप्निल खोत, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी हितेंद्र साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. ए. पाटील, प्रा. एस. ए. फराकटे यांनी, प्रा. डॉ. डी. बी. पाटील आभार मानले. यावेळी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी डोळसपणे योग्य क्षेत्र निवडावे
संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे म्हणाल्या, आजच्या युवा पिढीसमोर बदलत्या शिक्षणव्यवस्थेतून नवे ज्ञान, तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य क्षेत्र डोळसपणे निवडून, सातत्याने अभ्यास करून आपले करिअर घडविले पाहिजे.

Web Title: The identity of 'Self' is same as Avinash Dharmadhikari: Vivekananda College's Honorable Student Gala ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.