केंद्राने मोफत लस दिली नाही तर राज्य सरकार त्याबाबत धोरण आखणार :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:24+5:302021-01-09T04:19:24+5:30
कदमवाडी : सरकारने मोफत लस द्यावी, अशी विनंती केली आहे; पण केंद्राने नाही दिली तर राज्य सरकार या ...
कदमवाडी : सरकारने मोफत लस द्यावी, अशी विनंती केली आहे; पण केंद्राने नाही दिली तर राज्य सरकार या संबंधित धोरण आखणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. सेवा रुग्णालयात ड्राय रन मोहिमेच्या पाहणीसाठी मंत्री यड्रावकर आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर, सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल आणि शिरोली अशा चार ठिकाणी ही मोहीम पार पडली. सेवा रुग्णालयात नोंदणी झालेल्या २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत ही मोहीम पार पडली.
कोरोना लसीकरणासाठी आत्तापर्यंत २९ हजार ४०० नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी झाली असून, लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास मंत्री यड्रावकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम, विलासराव देशमुख, सी. एल. कदम, दिलीप वाडकर, संपत चौगले, प्रज्ञा जाधव, मृणालिणी पाटील, चंद्रकांत मोरे, प्रतीक पाटील, विद्या गोसावी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोट : केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकाला मोफत लस द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. जर केंद्राने मोफत लस दिली नाही तर राज्य सरकार त्याबाबत धोरण आखणार आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
फोटी ०८ यड्रावकर
ओळी : कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात आयोजित कोविड लसीकरण ड्राय रन मोहिमेची पाहणी करताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर. (छाया - दीपक जाधव)
..............................