दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 07:09 PM2019-11-11T19:09:19+5:302019-11-11T19:11:41+5:30
थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.
पन्हाळा- : तात्यासाहेब कोरे वारणा सह.साखर कारखान्यावरची जप्ती आदेशाची अंमलबाजवणी करण्यात यावी.व शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामातील व्याजासह पैसे वसुल करुन द्यावे अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने करण्यात आली यासाठी तहसीलदार कार्यालया समोर ठ्ठिय्या अंदोलन करण्यात आले पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील भागवले नाही तर मालमत्ता जप्त करणार अशी नोटीस साखर कारखान्यास दिली.
तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखरकारखान्याने शेतकऱ्यांची एफ.आर.पी थकवली होती.म्हणुन मा.साखर आयुक्त पुणे यांनी जानेवारी २०१९ मध्ये आर.आर.सी कारवाई केली होती.त्या आदेशाची प्रत पन्हाळा तहसिलदार यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात आली आहे.त्या आदेशानुसार कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन थकीत एफ.आर.पी व थकीत एफ.आर.पी वरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचवेळी जमा करायला पाहीजे होती.जप्ती आदेशाची अंमलबाजवणी आपणाकडुन तीन महिन्यात पुर्ण करणे कायद्याने बंधनकारक असताना गेले दहा महिने होत आले तरी तहसिलदार यांच्याकडुन जप्तीची कारवाई केलेली नाही.आजही सदर साखर कारखाना एफ.आर.पी चे चौतीस कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांची देणे आहे.तसेच थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.
महापुराने शेतकरी आर्थिक संकटात असताना कारखान्याने शेतकऱ्यांनी थकीत बिले यापुर्वीच द्यायला हवी होती.शिवाय नुकताच दिपावलीचा सण आर्थिक कुचंबणेमुळे करता आला नाही.यावरुन त्यांची बिले देण्याची मानसिकता दिसत नाही.म्हणुन आपण कारखान्याची शिल्लक साखर व उपपदार्थ यांची जप्ती करून शेतकऱ्यांची बिले आठ दिवसांच्या आत देण्यात यावी.अन्यथा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पासुन तहसिल कार्यलय पन्हाळा येथे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुव बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार अशी नोटीस जय शिवराय संघटनेने दिली होती त्यावर चर्चा होवुन तोडगा काढत तहसीलदार रमेश शेंडगे यांनी साखर कारखान्यास पुढील दहा दिवसात तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे देण्याची नोटीस लागु केली या नंतर आंदोलन स्थगीत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगीतले यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने,जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील,पन्हाळा तालुकाध्यक्ष अतुल पाटील,किरण पाटील(आप्पा),उत्तम पाटील,राहुल पाटील दत्ता पाटील,स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.
फोटो कँप्शन:-वारणा सह.साखर कारखान्यावरील जप्ती आदेशाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करताना जय शिवराय संघटनेचे कार्यकर्ते