ग्रेमॅक्सला जागा दिलांत तर जनआंदोलन, जनता दलाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:49 AM2021-07-08T10:49:59+5:302021-07-08T10:52:12+5:30
JantaDal Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या ग्रेमॅक्सला पुन्हा जागा दिली तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
गडहिंग्लज : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या ग्रेमॅक्सला पुन्हा जागा दिली तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व सहकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेटून येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना हे निवेदन दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील व जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ग्रेमॅक्स कंपनीबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असल्यामुळे ग्रेमॅक्सला अजिबात जागा देवू नये, त्याऐवजी ती जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना वाटप करावी. त्यातूनच गडहिंग्लज विभागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
निवेदनावर, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे व वीणा कापसे, राजेंद्र भुर्इंबर, गंगाराम विभुते, सलीम नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.