Kolhapur Politics: तर मी पालकमंत्री असतो, राजेश क्षीरसागरांनी पुन्हा व्यक्त केली सल; संभाजीराजेंबाबत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:12 IST2025-01-20T12:12:08+5:302025-01-20T12:12:45+5:30
शाहू छत्रपतींचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा

Kolhapur Politics: तर मी पालकमंत्री असतो, राजेश क्षीरसागरांनी पुन्हा व्यक्त केली सल; संभाजीराजेंबाबत म्हणाले..
कोल्हापूर : माझे व माजी खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल नेहमीच उलटे होते. आज मी कोल्हापूरचा पालकमंत्री आणि ते नाशिकचे खासदार असते, अशी सल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्हा भोई समाजाच्या तोरस्कर चौक येथील ‘भोईराज भवन’च्या उद्घाटन समारंभात ते रविवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, भोई समाज भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी असतो. पण, आता प्रकाश आबीटकर आहेत. लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे नाशिकमधून लढले असते तर खासदार झाले असते, मात्र त्यांनी निवडणूकच लढवली नाही. ते खासदार झाले नसले तरी त्यांची ताकद मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहू छत्रपतींचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा
खासदार शाहू छत्रपती यांचा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. राजघराणे जनमानसात आहे, त्यामुळेच हा विजय झाल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.