इचलकरंजी नगरपालिकेने सभा न घेतल्यास तक्रार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:43+5:302021-06-23T04:17:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिकेची सर्वसाधारण तसेच स्थायी समितीची सभा अधिनियमातील तरतुदीनुसार न घेतल्यास आपल्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेची सर्वसाधारण तसेच स्थायी समितीची सभा अधिनियमातील तरतुदीनुसार न घेतल्यास आपल्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे, असे निवेदन विरोधी पक्षनेते ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले आहे. या प्रकारामुळे पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
निवेदनात, सध्या कोरोनाचा संसर्ग असला तरी राज्य शासनाने ६ जुलै २०२० ला नगरपालिकेची आॅनलाईन सभा घेण्याचा अध्यादेश काढला आहे. इचलकरंजी नगरपालिकेची २६ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण, तर ३० मार्च रोजी स्थायी समितीची सभा घेणेत आली. मात्र, त्यानंतर अधिनियमातील तरतुदीनुसार एकही सभा घेण्यात आलेली नाही. याबाबत सभा घेण्यासाठी निवेदन दिले आहे. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सभा बोलावावी; अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल, असे म्हटले आहे.