हिंमत असेल तर ज्वोल्ले यांनी स्वत: आरोप करावेत
By admin | Published: February 19, 2015 12:30 AM2015-02-19T00:30:23+5:302015-02-19T00:30:36+5:30
काकासाहेब पाटील यांचे आव्हान
निपाणी : आपल्या कारकिर्दीत निपाणी मतदारसंघात अनेक विकासकामे राबवलीत; पण गेल्या १३ वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला होता हा आमदार शशिकला ज्वोल्ले यांचा आरोप चुकीचा आहे. आ. ज्वोल्ले यांनी हिंमत असेल तर कार्यकर्त्यांचा बळी न देता स्वत: आरोप करावेत, असे आव्हान माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले.ते म्हणाले, माझे विधान नैराश्येतून नाही. १९७७ मध्ये माजी खासदार बी. शंकरानंद, माजी आमदार रघुनाथराव कदम यांच्याबरोबर कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केले. १९८७ मध्ये कणगला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. त्यापूर्वी जिल्हा बॅँकेत संचालक, टोबॅको फेडरेशन, मार्केट कमिटी येथे पदाधकारी होतो.
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा व धरमसिंग, लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री मोइली, माजी मंत्री मुनीअप्पा, अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस आॅस्कर फर्नांडिस, बी. के. हरिप्रसाद, मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर या सर्वांना माझे कार्य माहिती आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे माझी सर्व कामे मी आमदार असल्याप्रमाणे मार्गस्थ लावतात. त्यामुळे नैराश्य येण्याचे कारणच नाही.
माझ्याबद्दल विधान व आरोप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी २०१८ मध्ये आमदार ज्वोल्ले यांना जरूर मदत करावी; मात्र बळीचा बकरा होऊ नये, असे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले आहे.
यावेळी खादी ग्रामोद्योग अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, गोपाळ नाईक, प्रदीप जाधव, सुकुमार पाटील, पंकज पाटील, राजेश कदम, कबीर वराळे, सीताराम मोहिते, लतिका सासणे, आदी उपस्थित होते.
————————
फोटो १८ एनपीएन ३
माजी आमदार काकासाहेब पाटील.