जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 17, 2024 10:31 PM2024-02-17T22:31:51+5:302024-02-17T22:32:19+5:30

मनोज जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास मराठा समाजाचा होणारा उद्रेक सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला.

If Jarange gets better or worse, the outburst of the Maratha community is unaffordable Maratha community protest at Shahu Samadhi place in Kolhapur | जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

कोल्हापूर : मनोजदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, मराठ्यांना फसवणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत शनिवारी सकल मराठा समाजच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे आत्मक्लेश आंदाेलन करण्यात आले. मनोज जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास मराठा समाजाचा होणारा उद्रेक सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. याविरोधात शनिवारी सकल मराठा समाजच्या वतीने शनिवारी दुपारी आत्मक्लेश आंदाेलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने मध्यस्थी करणे गरजेचे होते, पण शेवटी उच्च न्यायालयाला मध्ये पडावे लागले. शासनाने या प्रकरणात फक्त वेळकाढूपणा केला आहे. जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज लोकशाही मार्गाने आणि शांततेने आरक्षणासाठी लढत आहे. पण, त्यांच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास हे आंदोलन म्हणजे म्हणजे वादळापूर्वीची शांतता असेल.

यावेळी चंद्रकांत पाटील, सुभाष जाधव, इंद्रजित घाडगे, संपत पाटील, शिवराज गायकवाड, शाहीर दिलीप सावंत, सी.एम. गायकवाड, अनिल घाडगे, प्रकाश पाटील, विजय पाटील, शंकरराव शेळके, उदय लाड, मयूर पाटील, प्रताप नाईक, विक्रम जरग, सरदार पाटील, संयोगीता देसाई, दीपा डोने, सुनीता पाटील, गीता हसुरकर, रेश्मा पवार, भारती दिवसे, विद्या पोवार, मोहन सुर्वे, शरद साळुंखे, डॉ लक्ष्मीकांत नलवडे, अशोक गायकवाड, प्रसन्ना शिंदे, उत्तम वरुटे, गौरव लांडगे, मधुकर येवलुजे, विकास सुर्वे, संभाजी खेबुडकर, संदीप मोहिते, अनिल जाधव, अनिल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: If Jarange gets better or worse, the outburst of the Maratha community is unaffordable Maratha community protest at Shahu Samadhi place in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.