कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर भारत सुवर्णपदक जिंकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:20+5:302021-08-25T04:29:20+5:30
कणेरी : कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर भारतीय कबड्डी संघ नक्कीच सुवर्णपदक जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय ...
कणेरी : कबड्डीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर भारतीय कबड्डी संघ नक्कीच सुवर्णपदक जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील कबड्डी अकॅडमीला रेड्डी यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
श्री. रेड्डी म्हणाले, पाया भक्कम असेल तर खेळाडू चांगला घडतो. त्यामुळे पहिल्यापासूनच तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कबड्डीसारख्या सांघिक खेळाला शासनाचे सहकार्य अपेक्षित असून भरीव निधी कबड्डीला मिळाला तर दर्जेदार खेळाडू तयार करता येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रेड्डी यांनी कबड्डीपटूंनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःची वेगळी ओळख तयार करून खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करावा, असा सल्लाही दिला.