दफनभूमीची जागा मंजूर न झाल्यास जनआंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:32+5:302021-07-05T04:16:32+5:30

गारगोटी : शिवडाव येथील मुस्लीम समाज दफनभूमीच्या जागेसाठी आठ वर्षे प्रतीक्षेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेळ काढूपणामुळे समाजाला साडेपाच किमी ...

If the place of burial is not sanctioned, a people's movement will be started | दफनभूमीची जागा मंजूर न झाल्यास जनआंदोलन उभारणार

दफनभूमीची जागा मंजूर न झाल्यास जनआंदोलन उभारणार

Next

गारगोटी : शिवडाव येथील मुस्लीम समाज दफनभूमीच्या जागेसाठी आठ वर्षे प्रतीक्षेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेळ काढूपणामुळे समाजाला साडेपाच किमी अंतरावरील दफनभूमीकडे मृतदेह न्यावे लागतात. या समस्येवर लोकमतने आवाज उठविला आहे.

मुस्लीम समाजातील लोकांचे पावसाळ्यात होणारे हाल पाहून २०१३ साली तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गायरानातील दहा गुंठे जागा दिली. समाजाच्या अंजुमन वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दफनभूमी उभारण्याचा संकल्प केला. महसूल विभागाच्या तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी ही नोंद सरकारी दप्तरी करण्यासाठी मंजुरी दिली. अंतिम मंजुरीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली. ही मंजुरी मिळवताना गेली आठ वर्षे या समाजातील सामजिक कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. गावातील २५५ लोकांच्या सह्यांचे निवेदनदेखील देण्यात आले. पण वेगवेगळ्या ना हरकत दाखल्यांसाठी हेलपाटे मारून जेरीस आलेल्या या लोकांना ‘जागा विकत घेतली असती तर बरं झाले असते!’ अशी या समाजाची धारणा झाली आहे. लवकरात लवकर जागा मंजूर न झाल्यास तहसीलदार कार्यालयाच्या दरात जनआंदोलन करण्याच्या मानसिकतेत येथील ग्रामस्थ आहेत.

याबाबत मुस्लीम समाजाचे तालुकाध्यक्ष बी. जे. देसाई म्हणाले, गावसभेने एकमताने मंजूर केलेल्या गायरानातील जागा दफनभूमीला देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अडचण असण्याचे कारण नाही. गावातील सुमारे ३०० लोकांनी तक्रार नसल्याचे निवेदन सह्या करून दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून समाजाला ही जागा लवकरात लवकर मंजूर करून द्यावी.

याबाबत आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ग्रामपंचायतने गावसभेत ठराव मंजूर करून ही जागा या समाजाला दिली असताना शासकीय कार्यालये अडवणूक करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. याचा पाठपुरावा ही जागा लवकरात लवकर या समाजाच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: If the place of burial is not sanctioned, a people's movement will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.