आरक्षण न मिळाल्यास आमदारकीचा राजीनामा
By admin | Published: October 4, 2016 01:06 AM2016-10-04T01:06:25+5:302016-10-04T01:09:01+5:30
राजेश क्षीरसागर यांचा इशारा
कोल्हापूर : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्नावर सत्ताधारी भाजप - शिवसेना सरकारने निर्णय न घेतल्यास राजीनामा देऊ, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी दिला. ते गुरुवार पेठेतील संयुक्त मेळाव्यात बोलत होते. अंबा भवन येथे हा मेळावा झाला.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी सातत्याने अन्याय झाला आहे. याबाबत अधिवेशनातही हा प्रश्न मी मांडला होता. मात्र, न्यायप्रविष्ठेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. मराठा आरक्षण मिळाल्यास या समाजातील मुलांना केंद्रीय व लोकसेवा आयोगातील परीक्षेत फायदा होईल. इतर राज्यांत जातीप्रश्नावर आंदोलन झाले तर तेथील सरकार लगेच दखल घेते. ाामुळे या सरकारनेही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे. आता आग लागली आहे. ज्वाला भडकत आहेत. याचा सरकारने विचार करावा. तसेच मराठा समाजाने असाच एकोपा करून १५ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहनही आ. क्षीरसागर यांनी केले. अमित चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
बैठकीत संजय देसाई, दिलीप माने, महेश उरसाल, सागर साळोखे, आदींनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव, जे. डी. जाधव, अशोक कसबेकर, जयवंत कसबेकर, अमित चव्हाण, महेश लाड, मंदार कणेरकर, रणजित आयरेकर, शकील जमादार, अंकुश पाटील, भरत जाधव, अभय नाचणकर, अनिल जाधव, मंगला साळोखे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.