सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

By admin | Published: January 5, 2017 11:50 PM2017-01-05T23:50:02+5:302017-01-05T23:50:02+5:30

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

If sadness gets big, why should I be sad, they will not leave the party: Shetty | सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

Next


कोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रवाहातून बाजूला जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्व दिले गेले तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारणच नाही कारण संघटनेतून त्यांना मंत्री करा असे मीच सरकारला सुचविले होते असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली असून, सदाभाऊ भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस प्रसिध्दी माध्यमांतून चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही दोघेही गेली पंचवीस वर्षे एकत्र चळवळीत काम करीत आहे. सदाभाऊंना मंत्री करावे असे संघटनेतून एकमेव नांव आम्ही सुचविले होते. त्यावेळीही कोणताच वाद नव्हता. मंत्री झाल्यावर सरकारच्या कामाबद्दल जसे चळवळीत आक्रमकपणे बोलता येते तसे बोलता येत नाही त्यामुळे त्यांची भाषा थोडी नरम झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मंत्रिमंडळात त्यांचे महत्त्व वाढले तर त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. कारण माझा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मला चळवळीचा आधार घेऊन सत्तेत जायचे असते तर यापूर्वीच ते करता आले असते.
शेतकरी चळवळीचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे आणि सरकार चुकत असेल तर त्याविरोधात आक्रमकपणे बोलून सरकारला जाग्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच भूमिका मी सध्या पार पाडत आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे तेवढे एकच अस्त्र आमच्याकडे आहे. कारण आमचा एकही आमदार नाही.’ (प्रतिनिधी)

Web Title: If sadness gets big, why should I be sad, they will not leave the party: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.