Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:35 AM2024-01-24T11:35:15+5:302024-01-24T11:38:48+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने तेथून लढण्यास सांगितले तर लढण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.
खा. महाडिक म्हणाले, देशातील सध्याचे वातावरण पाहिले तर जनता भाजपसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला सध्यातरी पर्याय नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० च्या पुढे जागा मिळतील. उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत तेच निर्णय घेतील.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील एक जागा भाजपला मागितल्याचे मला माहीत नाही. मात्र, पक्षाने यातील एक जागा स्वत:कडे घेऊन मला लढण्यास सांगितले तर मी लढण्यास इच्छुक आहे.