Maharashtra Karnataka Border Dispute: 'धमक असेल तर सीमाबांधवांच्या मेळाव्याला बेळगावात या'

By समीर देशपांडे | Published: December 10, 2022 02:05 PM2022-12-10T14:05:54+5:302022-12-10T19:48:12+5:30

माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांचे राज्य शासनाला आव्हान

If there is a threat, come to Belgaum for the border workers meeting, MLA Hasan Mushrif challenge to the state government | Maharashtra Karnataka Border Dispute: 'धमक असेल तर सीमाबांधवांच्या मेळाव्याला बेळगावात या'

छाया : नसीर अत्तार

googlenewsNext

कोल्हापूर कर्नाटकातील सीमाबांधवांनी १९ डिसेंबरला बेळगावमध्ये मेळावा ठेवला आहे. आम्ही या मेळाव्याला जाणार आहेात. जर तुमच्यात धमक असेल तर या मेळाव्याला तुम्हीपण या असे जाहीर आव्हान माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाला दिले. 

महाविकास आघाडीच्यावतीने कर्नाटक शासनाच्याविरोधातील आंदोलनावेळी मुश्रीफ बोलत होते. सुमारे तीन तास चालेल्या या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. 

मुश्रीफ म्हणाले, कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्याने भावनिक वातावरण करण्यासाठी महाराष्ट्राला डिवचण्याचे काम सुरू आहे. आमचे दोन्ही समन्वय मंत्री घाबरून बेळगावला गेलेले नाहीत. ज्या दिवशी कर्नाटकचे अधिवेशन आहे त्याच दिवशी सीमाबांधवांचा महामेळावा आहे. त्यामुळे धमक असली तर मंत्र्यांनी तिथे यावे. 

..त्याचाच हा एक भाग 

माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची लढाई सुरू असताना जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. भाजपकडून इतिहास पुसायचे काम सुरू असून त्याचाच हा एक भाग आहे. परंतू आम्ही सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे आहोत. 

ते दिल्लीचे डोके 

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, बोम्मई आज जे बोलत आहे ते त्याचे डोके नाही. ते दिल्लीचे डोके आहे. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार मनोहर किणीकर, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. दिलीप पवार, प्रा. टी. एस. पाटील, वसंतराव मुळीक यांची भाषणे झाली. 

यावेळी आमदार पी एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: If there is a threat, come to Belgaum for the border workers meeting, MLA Hasan Mushrif challenge to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.