ज्ञानभाषा झाल्यास मराठीचा विस्तार होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:46 AM2021-02-28T04:46:34+5:302021-02-28T04:46:34+5:30
: तिटवे येथे मराठी भाषा गौरव दिन लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : मराठी ही ज्ञान, व्यवहार व आविष्कार भाषा ...
: तिटवे येथे मराठी भाषा गौरव दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
तुरंबे : मराठी ही ज्ञान, व्यवहार व आविष्कार भाषा झाल्यास तिचा विस्तार अधिक वेगाने होईल, असे प्रतिपादन प्रा. सुनील पाटील यांनी केले. तिटवे, ता. राधानगरी येथील शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत पालकर होते.
ते पुढे म्हणाले, मराठी भाषेवर अनेक आक्रमणे होऊनही ती जनभाषा म्हणून स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. मराठी संस्कृतीचे सिंचन झाल्यास ती समृद्ध, संवेदनशील व संवर्धित होईल.
यावेळी विद्यार्थिनींनी पर्यावरण वाचवा विषयावर पथनाट्य सादर केले तसेच पोस्टर मोडेल प्रेझेंटेशन व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.
प्रारंभी स्वागत प्रा. राहुल कांबळे यांनी केले. यावेळी प्रा. दिग्विजय कुंभार, प्रा. रोहिणी साळुंखे, प्रा. स्नेहलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आकांक्षा अनाजेकर व अक्षता भोसले यांनी केले. आभार प्रा. ऋतुजा कांबळे यांनी मानले.