हेरिटेज वास्तूला बाधा नसेल तर पंचगंगा घाटास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:56 AM2021-07-09T11:56:39+5:302021-07-09T11:58:56+5:30

river Kolhapur : पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यामुळे हेरिटेज वास्तूला बाधा येते का, याची संयुक्त छाननी करून जर बाधा येणार नसेल तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाची एनओसी मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, अशा सक्त सूचना गुरुवारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

If there is no obstacle to heritage architecture, allow Panchganga Ghat | हेरिटेज वास्तूला बाधा नसेल तर पंचगंगा घाटास परवानगी द्या

हेरिटेज वास्तूला बाधा नसेल तर पंचगंगा घाटास परवानगी द्या

Next
ठळक मुद्देहेरिटेज वास्तूला बाधा नसेल तर पंचगंगा घाटास परवानगी द्याखासदार मंडलिक यांनी बजावले : तक्रारीनंतर थांबवले आहे काम

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यामुळे हेरिटेज वास्तूला बाधा येते का, याची संयुक्त छाननी करून जर बाधा येणार नसेल तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाची एनओसी मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, अशा सक्त सूचना गुरुवारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जर हेरिटेज कमिटीला काही शंका असतील तर त्यांनी जागेवर कागदोपत्री पुराव्यानिशी हेरिटेज वस्तूला धक्का लागतो हे सिद्ध करावे, जर असे सिद्ध झाले नाही तर हेरिटेज कमिटीने या कामास विनाशर्त परवानगी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. विकास कामात कोणी आडवा येत असेल तर ते योग्य नाही, त्यांनी असे प्रयत्न करणे चुकीचे आहे, अशा शब्दात खासदार मंडलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

पंचगंगा घाटाचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, हेरिटेज कमिटी सदस्य यांची संयुक्त बैठक गुरुवारी मंडलिक यांनी घेतली. या बैठकीत बांधकाम विभाग व आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी आराखड्यांना यापूर्वी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने एनओसी दिल्यानंतर कामाला सुरुवात केली होती; परंतु तक्रारी आल्याचे सांगून हेरिटेज कमिटीच्या सूचनेनुसार महापालिकेने काम थांबविले असल्याचे सांगितले.

पंचगंगा घाट विकासाचे काम झालेच पाहिजे, ज्या कोणी तक्रारी केल्या आहेत त्यात कितपत तथ्य आहे याची खात्री करून घ्या, विकासकामामुळे हेरिटेज वास्तूला कुठे बाधा पोहचते का तपासून पाहा, जर कोणतीच बाधा पोहचत नसेल तर तुम्ही सर्वजण सोमवारी एकत्र बसून चर्चा करा आणि सामूहिकपणे केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार मंडलिक यांनी दिल्या.

बैठकीला सहायक संचालक रामचंद्र महाजन, कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता भोसले, महापालिकेचे अभियंता सुनील भाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दिघे, प्रशांत हडकर, हेरिटेज कमिटी अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्य उदय गायकवाड उपस्थित होते.

निंबाळकर बैठकीतून निघून गेल्या -

बैठक संपता संपता आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर आराखडा समजावून सांगत असताना हेरिटेज कमिटीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर बैठक सोडून न सांगता निघून गेल्या. त्या निघून जाण्याचे कारण कोणालाच कळले नाही; परंतु त्यांच्या जाण्यामुळे खासदार मंडलिक यांच्यासह सगळेच अचंबित झाले.

Web Title: If there is no obstacle to heritage architecture, allow Panchganga Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.