मनामध्ये जिद्द, चिकाटी असेल तर उद्दिष्टपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:27+5:302021-07-02T04:17:27+5:30
भोगावती : एखाद्या गोष्टीबाबत मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर ठरवलेली उद्दिष्टपूर्वी नक्की होते. त्यासाठी मेहनत आणि एकाग्रतेची गरज ...
भोगावती : एखाद्या गोष्टीबाबत मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर ठरवलेली उद्दिष्टपूर्वी नक्की होते. त्यासाठी मेहनत आणि एकाग्रतेची गरज आहे, असे प्रतिपादन नूतन लेफ्टनंट साईप्रसाद विष्णुपंत पाटील यांनी केले.
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्यावतीने आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर होते.
साईप्रसाद पाटील यांची लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल तर पत्रकार प्रवीण ढोणे, संभाजी सारंग, डॉ. सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, प्रा. सुनील खराडे, प्रा. शिवाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत, प्रास्ताविक कार्यकारी संचालक संजय पाटील-पिरळकर यांनी केले. या वेळी माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, कृष्णराव पाटील, शिवाजी कारंडे, मारुतराव जाधव, ए. डी. पाटील, संजयसिंह पाटील, रवी पाटील-तारळेकर, जयवंत कांबळे आदी उपस्थित होते. आभार संचालक धीरज डोंगळे यांनी मानले.
फोटो ओळी :
लेफ्टनंट साईप्रसाद पाटील यांचा भोगावती साखर कारखान्यांच्यावतीने सत्कार उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यकारी संचालक संजय पाटील, सुनील खराडे, मोहन डवरी, मारुतराव जाधव आदी उपस्थित होते.
(छाया/संजू नकाते, राशिवडे)