धमकी दिली, तर गुन्हा का दाखल केला नाही : सुरेश गडगे यांची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:25 AM2021-03-05T04:25:08+5:302021-03-05T04:25:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांनी मी त्यांना धमकी दाखवून दबाव टाकत असल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांनी मी त्यांना धमकी दाखवून दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. मी तसे केले असेल तर त्यांनी माझ्यावर रीसतर गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती आघाडीचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गडगे यांनी केली आहे.
गडगे हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक जीवनात सक्रिय आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घालून दिलेली पंचसूत्री प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (महाराष्ट) चे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्यात आल्यापासून त्यांच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद नाही. लोकशाहीच्या चौकटीत बसतील अशीच आंदोलने ते करत आले आहेत. आजपर्यंत त्यांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडलेली नाही. (लोकमतच्या ३ मार्चच्या अंकात सुरेश गडगे यांच्याकडून धमकी दाखवून दबाव असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या बातमीच्या आधारे ते देण्यात आले असून त्यामागे गडगे यांची बदनामी करण्याचा हेतू नाही.)