माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:25 AM2020-06-25T11:25:56+5:302020-06-25T11:30:22+5:30

कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला.

If we don't apologize, we will show Kolhapuri jerk to Padalkar | माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू

माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉग्रेसचा कोल्हापुरी इशारा पोकळ बडबड करण्यापेक्षा शरद पवार यांच्या योगदानाचे भान ठेवावे

कोल्हापूर : कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी टीका बुधवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उटले आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून याचा निषेध केला.

पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंकच आहे. पडळकरांचे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्षे शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ आयुष्य खर्च केले. त्यांनी आपले वय, सामाजिक कर्तृत्व आणि समाजकारण-राजकारणातील आपले योगदान किती, याचेही भान ठेवायला हवे होते.

शरद पवार यांनी उभी हयात महाराष्ट्राच्या आणि विशेषत: बहुजन समाजाच्या विकासासाठी खर्च केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नविद मुश्रीफ, अनिल साळोखे यांनी पत्रकातून दिली.

पडळकर हे धनगर समाजाला लागलेला शाप

पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली. त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून विश्वासघात केला असून, ते म्हणजे समस्त धनगर समाजाला लागलेला शापच असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: If we don't apologize, we will show Kolhapuri jerk to Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.