पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:49 PM2018-10-01T13:49:26+5:302018-10-01T13:50:55+5:30

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले.

If you can not give water, then resign, unanimity of Kolhapur Water Engineers in standing committee meeting | पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी

पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी

Next
ठळक मुद्देजर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामे देवून घरी जावे, अशा शब्दांत अजिंक्य चव्हाण यांनी कुलकर्णी यांना सुनावले.जोपर्यंत जल अभियंता सभेला येत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही, असा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर : शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले. सभेला उशिरा आल्याबद्दल कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती आशिष ढवळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दिले. विशेष म्हणजे महिला सदस्यांनी सभेत तीव्र नापसंती व्यक्त करत तातडीने पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी केली.

गेले काही महिने शहरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. नागरिक नगरसेवकांच्या दारात जाऊन त्यांचा उद्धार करत आहेत. तसेच रास्ता रोकोसारखी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभेत पडसाद उमटणे स्वाभाविक होते. त्यातच पाणी पुरवठा अधिकारी सभेला वेळेत आले नाहीत; त्यामुळे सदस्यांचा संताप आणखी वाढला. जोपर्यंत जल अभियंता सभेला येत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जल अभियंता कुलकर्णी यांना बोलावून घेतले.

कुलकर्णी सभागृहात येताच त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडत त्यांना फैलावर घेतले. मागील अनेक सभेत चर्चा होऊनदेखील पाणी पुरवठ्याचे नियोजन केलेले नाही. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही, अशा शब्दांत सभापती ढवळे यांनी नापसंती व्यक्त केली. पाणी मिळणार आहे की नाही, हे प्रशासनाने एकदा सांगावे, अशा शब्दांत संजय मोहिते यांनी कुलकर्णी यांना झापले. रोज महिला आमच्या दारात येत आहेत. मागील नगरसेवक असताना आम्हाला पाण्याचा त्रास झाला नाही; परंतु तुम्ही आल्यापासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत नागरिक आमची कान उघाडणी करत आहेत.

जर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामे देवून घरी जावे, अशा शब्दांत अजिंक्य चव्हाण यांनी कुलकर्णी यांना सुनावले. पाण्याचा खजिना येथील कर्मचारी उद्धट उत्तरे देतात. मदन यादव हा कर्मचारी अशाच पद्धतीने नगरसेवकांशी बोलतो त्याची ताबडतोब बदली करा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. शेवटी सभागृहात पाणी पुरवठ्यासंबंधी समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने अधिकाºयांच्या निषेधार्थ ही सभा तहकूब करण्यात आली.

एक दिवस आडचा पर्याय
पाणी पुरवठा नियोजनात ५ ते ६ महिने बदल करून पाहिले आहे. पाणी पुरवठ्याची क्षमता व नवीन वाढलेली कनेक्शन याचा ताळमेळ बसत नाही; त्यामुळे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा आमचा विचार आहे. तसा प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या मान्यतेला सादर करू, असे जल अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.

ए व बी वॉर्डला पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा व्यवस्थितझाला नाही. पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी चार कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा खुलासाही कुलकर्णी यांनी यावेळी केला.

Web Title: If you can not give water, then resign, unanimity of Kolhapur Water Engineers in standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.