हिंमत असेल तर समोर येऊन आरोप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:14 AM2018-02-15T00:14:14+5:302018-02-15T00:14:31+5:30
कोल्हापूर : कुणाच्या तरी सांगण्यावरून राष्टÑवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यापेक्षा हिंमत असेल तर महापालिका चौकात किंवा बिंदू चौकात येऊन समोरासमोर येऊन आरोप करा. त्यावेळी तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचे वस्त्रहरण करू, असा इशारा राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी फुटीर नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांना दिला. पिरजादे यांच्या बुधवार पेठेतील घरासमोर निदर्शने केल्यानंतर झालेल्या सभेत हा इशारा देण्यात आला. निदर्शने करणाºया सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन
नंतर सोडून दिले.
सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या नगरसेविका मेघा पाटील यांचा झालेला पराभव आणि लगोलग नगरसेवक अफजल पिरजादे यांनी राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे बुधवारी राष्टÑवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पिरजादे यांच्या बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
मोर्चाद्वारे गेलेल्या कार्यकर्त्यांनी पिरजादे यांच्यावर शेण व चपलांचा मारा करायचे ठरविले होते. त्यामुळे पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना नर्सरी बागेजवळच अडविण्यात आले. त्याठिकाणी पोलीस व कार्यकर्त्यांत थोडा वाद झाला. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असून, पिरजादे यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने करण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला; परंतु पोलिसांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे नर्सरी बागेजवळील मुख्य रस्त्यावरच निदर्शने करण्यास सुरुवात झाली.
मोर्चासमोर राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, महिला अध्यक्षा जहिदा मुजावर, उपमहापौर सुनील पाटील, नगरसेवक महेश सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी भाषणे करून फुटीर नगरसेवक पिरजादे व चव्हाण यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी ‘गली गली में शोर हैं, अफजल-अजिंक्य चोर हैं’ अशा घोषणा दिल्या. निदर्शनात नगरसेवक मुरलीधर जाधव, आशिष पाटील, रमेश पोवार, विलास कुंभार, परीक्षित पन्हाळकर, महादेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पिरजादे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय जुना बुधवार पेठेतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे पोलिसांनी राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांना पिरजादे यांच्या घरापासून बºयाच अंतरावर अडविले होते.
पोलिसांवर कोणाचा दबाव?
घरासमोर पोलीस निदर्शने करू देत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. ‘आम्ही चोराला चोर म्हणायला येथे आलोय. गद्दारी करणाºया पिरजादेला जाब विचारण्यास आलो आहोत; तरीही तुम्ही जर आम्हाला अडविणार असाल तर तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आहे. बेकायदेशीर कृत्य करणाºयाला आम्ही जाब विचारणारच,’ असा इशारा लाटकर यांनी दिला.
निवडणूक लढवा : पोवार
तुमच्यात धमक असेल तर दुसºया पक्षाकडून निवडणूक लढवा आणि निवडून या, असे आव्हान आर. के. पोवार व आदिल फरास यांनी दिले. पक्षाने तुम्हाला निवडून आणले, पदे दिली. त्याच पक्षावर आणि नेत्यांवर आरोप करता. तुमची ही गद्दारी खपवून घेणार नाही. राजीनामा देत नाही तोपर्यंत तुम्हाला हैराण करून सोडू, असेही पोवार म्हणाले.
गद्दारांकडून
पेठांना गोवण्याचा नाहक प्रयत्न
स्थायी सभापती निवडणुकीत कोटींचे व्यवहार करून राजकारणाला काळिमा फासणाºया अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्याविरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत. हे आंदोलन राजकारणातील दुष्ट प्रवृत्तीविरोधात आहे; परंतु या गद्दारांनी पेठांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच गद्दार नगरसेवकांच्या भावनिक आवाहनास पेठवासीयांनी बळी पडू नये, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांना महापालिकेच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक फंड दिला. स्वत: मतदारसंघात फिरून निवडून आणले. याचा या दोन्ही गद्दारांना विसर पडलेला दिसतो. या गद्दारांविरुद्धची लढाई त्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही. या पत्रकावर उपमहापौर सुनील पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, जहिदा मुजावर, अनिल कदम, सुहास साळोखे, परीक्षित पन्हाळकर, उत्तम कोराणे, रियाज कागदी यांच्या स्वाक्षºया आहेत.
मीच पालिका चौकात येतो : चव्हाण
महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारास मतदान करणाºया नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसच्यावतीने आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. पक्षाचा व्हीप डावलल्याबद्दल नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी केली जाईल, असे माजी महापौर आर. के. पोवार यांनी सांगितले.
दरम्यान, शिवाजी पेठेत येऊन मोर्चा काढणे किंवा माझ्याबद्दल अपशब्द बोलण्यापेक्षा पालिकेत मी एकटाच येतो, राष्टÑवादीच्या नेत्यांमध्ये (आदिल फरास, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर) दम असेल तर त्यांनी समोरासमोर विरोध करून दाखवावा, असे आव्हान चव्हाण यांनी दिले आहे.
पक्षाशी गद्दारी करणाºया अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा राष्टÑवादीने दिला असून आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात निदर्शने केली जाणार आहेत. यात शिवाजी पेठेतील राष्टÑवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवार मेघा पाटील यांचा झालेला पराभव राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना जिव्हारी लागला आहे. त्यातच नगरसेवक पिरजादे यांनी पत्रक काढून सर्वच नेत्यांवर आरोप केल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पिरजादेंचे आरोप पाहता त्यांच्यामागे कोणी तरी ‘शिक्षक’ असावा, असा समज कार्यकर्त्यांचा झालेला आहे. त्याची माहिती राष्टÑवादी गोळा करीत आहे. त्यासाठी काही लोकांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात आहे.
चव्हाण, पिरजादे यांच्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त, चित्रीकरण, छायाचित्रे, आदी कागदपत्रांची मागणी गटनेते सुनील पाटील यांनी आयुक्तांकडे मागितली आहे. दोघांना पक्षातून काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
‘राष्टÑवादी’ने धर्मनिरपेक्ष राजकारण करावे
कागलमध्ये स्वार्थासाठी संजय मंडलिक यांच्याशी युती, चंदगड कारखान्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी युती आणि शहरात जातीय राजकारण केले जात आहे. महापौर, उपमहापौर, महिला बालकल्याण सभापती यासह राष्टÑवादीचे पदाधिकारी विशिष्ट धर्माचे केले जातात. राष्टÑवादीच्या नेत्यांना बहुजन समाजातील कोणी दिसत नाही काय? असा सवाल नगरसेवक चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केला आहे. माझ्या प्रभागात विकासनिधी कमी मिळतो. भाजपाकडून निधी मिळण्याची शाश्वती मिळाल्यानेच विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा अजिंक्य चव्हाण यांनी केला आहे.
पैसे घेतल्याचे सिद्ध करा, अन्यथा दावा
स्थायी समिती सभापती निवडणुकीत पैसे घेऊन मतदान केल्याचा आरोप राष्टÑवादीचे नेते करीत आहेत. हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा अजिंक्य चव्हाण यांनी दिला. शिवाजी पेठ ही स्वाभिमानी पेठ आहे. या पेठेची बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.