आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:31 AM2020-01-31T10:31:44+5:302020-01-31T10:32:56+5:30

परंतु दडपशाहीचा प्रयत्न न थांबल्यास एक दिवस काम बंद ठेवून जिल्हा परिषदेला घेराव घालावा लागेल. त्यानंतर होणाºया परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिला आहे.

If you try to suppress the agitation, surround the Zilla Parishad | आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव

Next
ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचारी संघाचा इशारा : अंगणवाडी डेटा सिंक न करण्याचे आंदोलन सुरूच

कोल्हापूर : महिन्याचे मानधन नसल्यामुळे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने सुरू केलेला डेटा सिंक न करण्याचे आंदोलन जिल्ह्यात जोर धरत आहे; पण हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषदेला घेराव घालणार असल्याचा इशारा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे दिला आहे.

पुरामुळे व पावसामुळे आधीच त्रस्त अंगणवाडी सेविका तीन महिने मानधन नसल्यामुळे त्रासल्या आहेत. यंत्रणेने मानधन वाटपाची सर्व तयारी केली; पण अर्थमंत्र्यांकडून अद्याप मानधनाची रक्कम दिली नसल्याने राज्यभर अंगणवाडी सेविका संतप्त झाल्या आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्ह्याने पुढाकार घेत डेटा सिंक न करण्याचे व मीटिंग, ट्रेनिंगवर बहिष्कार करण्याचे आंदोलन सुरू केले आहे; परंतु जिल्हा परिषदेकडील तालुक्यातील काही अधिकारी याबाबत दडपशाही करीत आहेत. हे आंदोलन स्थानिक अधिकाऱ्यांविरोधात नाही; परंतु दडपशाहीचा प्रयत्न न थांबल्यास एक दिवस काम बंद ठेवून जिल्हा परिषदेला घेराव घालावा लागेल. त्यानंतर होणा-या परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिला आहे.
 

Web Title: If you try to suppress the agitation, surround the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.