जगात भारी आम्ही कोल्हापुरी, इचलकरंजीत हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी; सामाजिक सलोख्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:15 AM2022-04-27T11:15:32+5:302022-04-27T11:16:43+5:30

राज्यात एकीकडे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना, वस्त्रनगरीत मात्र सामाजिक संदेश देण्यात आला.

Iftar party at Maharudra Hanuman Temple in Indiranagar area of ​​Ichalkaranji kolhapur district | जगात भारी आम्ही कोल्हापुरी, इचलकरंजीत हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी; सामाजिक सलोख्याचे दर्शन

जगात भारी आम्ही कोल्हापुरी, इचलकरंजीत हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी; सामाजिक सलोख्याचे दर्शन

googlenewsNext

इचलकरंजी : येथील इंदिरानगर परिसरातील भाऊ ग्रुपच्या वतीने महारुद्र हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी करण्यात आली. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू असून, त्या निमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना, वस्त्रनगरीत मात्र सामाजिक संदेश देण्यात आला.

इंदिरानगरात दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद यासह विविध सण उत्सव सर्वांच्या सहभागातून उत्साहात साजरे केले जातात. या भागात एकता आणि बंधुता टिकवून सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. त्याच अनुषंगाने सोमवारी (दि.२५) सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

राज्यात सुरू असलेल्या जातीयवादाकडे दुर्लक्ष करत, सर्वांनी आपापसात समन्वय ठेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि बंधुता कायम ठेवावी. आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते, असे अजिज खान यांनी सांगितले. सायंकाळी ६.५३ वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोपाहार घेतला. इफ्तार पार्टीत बशीर करडी, दस्तगीर अत्तार, दत्ता धुमाळ, भारत पोळ, सुखदेव माळकरी, आदींसह नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.

Web Title: Iftar party at Maharudra Hanuman Temple in Indiranagar area of ​​Ichalkaranji kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.