इचलकरंजीत तिसºया दिवशीही यंत्रमाग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:56 PM2018-01-03T23:56:17+5:302018-01-04T00:05:12+5:30
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसºया दिवशी बुधवारी सभा घेण्यात आली. यामध्ये आज, गुरुवारी सकाळी भव्य फेरी काढण्याची घोषणा करण्यात आली. तसेच सायंकाळी लिंबू चौकात सभा होणार आहे.
सन २०१३ सालच्या मजुरीवाढीच्या करारानुसार यंत्रमाग कामगारांना सन २०१७ च्या महागाई भत्त्यानुसार मजुरीमध्ये वाढ द्यावी, त्याचबरोबर फरकाची रक्कमही द्यावी, या मागणीसाठी १ जानेवारीपासून येथील यंत्रमाग कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत अनेक वक्त्यांनी भाषणे केली. त्यामध्ये कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. किमान वेतन म्हणून अठरा हजार रुपये द्यावेत. ईएसआय योजना लागू करावी. यंत्रमाग कामगारांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनामार्फत दोन लाख रुपये खात्यावर वर्ग करावे, या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यावेळी दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, परशराम आगम, धोंडिबा कुंभार, सदा मलाबादे, पार्वती जाधव, आदींची भाषणे झाली.
नेटाने संप
रेटण्याचा निर्णय
कितीही दिवस लागले तरी यंत्रमाग कामगारांना ठरलेल्या करारानुसार मजुरीवाढ दिली जात नाही, तोपर्यंत सुरू केलेल्या बेमुदत बंदचे आंदोलन नेटाने रेटण्याचा निर्णय सभेमध्ये एकमताने घेण्यात आला. या निर्णयाला कामगा रांनीही जोरदार घोषणा देत पाठिंबा दर्शविला.