कृषी अधिक्षकांनी तीन दुकानदारांचे सात दिवसाठी केले निलंबन; अवैध खतविक्री करणाऱ्यांना चाप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:09 AM2020-04-23T11:09:39+5:302020-04-23T11:12:47+5:30
व्यापाऱ्यांच्या या दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली .
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड -: लॉकडाउनचा फायदा उठवून शेतकऱ्यांना जादा दराने खत विक्री करण्याबरोबरच लिंकिंग चा भुर्दंड गळयात घालण्याचे प्रकार खत विक्री केंद्र मालकांकडून वाढत आहेत. या विषयावर गेले तीन चार दिवस लोकमतने पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणली . त्याचा परीणाम म्हणून आज जिल्हा कृषी अधिक्षकांनी राधानगरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद व एका संघाच्या शाखेवर सात दिवसाच्या निलंबनाचे आदेश काढले . त्यामुळे अवैध खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच चाप बसला असून अवैद्य खतविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .
लॉकडाऊनच्या संधीचा फायदा उठवून तालुक्यातील बहुतांशी खतविक्री केंद्रावर छुप्या पध्दतीने अवैद्य खतविक्री, सक्तीने लिंकिंग घेण्याचा हट्ट व जादा दराने खतविक्रीचे करण्याच्या प्रकारात वाढ होत होती . शेतकरी ही नाईलाजाने या व्यापाऱ्यांकडून ज्यादा दराने खत घेत होत . व्यापाऱ्यांच्या या दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली .
राधानगरीचे तालुका कृषी अधिकारी पी .बी. माने व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुजीत शिंदे यांनी सदर दुकानदारांची चौकशी करुन त्यांचा कडील खताचास्टॉक व रजीस्टर अद्ययात आहेत का याची खात्री करून आपला गोपणीय अहवाल जिल्हा कृषी अधिक्षकांकडे पाठवला . त्यावर आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी निर्णय घेत . तालुक्यातील राधानगरी तालुका शेतकरी संघ शाखा धामोड , कृष्णाई शेती सेवा केंद्र क॥ वाळवे व रेणूका शेती सेवा केंद्र सरवडे यांच्यावर सात दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली आहे . त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे . तर खत विक्री केंद्र मालकांचे धाबे दणाणले आहेत .
संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून या तिनही खत विक्री करणाऱ्या दुकानांवर सात दिवसाचे निलंबन केले आहे . या सात दिवसात त्यांना कोणतेही देवघेव व्यवहार करता येणार नाहीत . तसेच त्यांनी या सात दिवसात सर्व रेकॉर्ड अपडेट करून लेखी हमीपत्र दयावयाचे आहे .
ज्ञानदेव वाकुरे; (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी )