निलजी येथे दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:21 PM2020-03-26T19:21:28+5:302020-03-26T19:29:50+5:30
निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
गडहिंग्लज : निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी अलाबक्ष नबीसो पिंजारे (वय ३६) व आनंदा कृष्णा बागडी( वय ३९ दोघे रा. निलजी ता. गडहिंग्लज) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
'कोरोना महामारी'च्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्याच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक एस.एस.बर्गे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, उपनिरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.