अवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:31 PM2021-01-29T16:31:22+5:302021-01-29T16:38:16+5:30

Crime News Forest Department Kolhapur- कोते - मानेवाडी मार्गावरती एनारी ( ता. वैभववाडी ) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासूर्ली वनपाल व त्यांच्या टिमने अवैद्य खैर लाकडाची वाहतूक करताना पकडले.

Illegal Khair transport gang caught in Forest Department trap! | अवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !

अवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !

Next
ठळक मुद्देअवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !धामोड-मानेवाडी रोडवर पहाटे दोन वाजता कारवाई ; लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड :  कोते - मानेवाडी मार्गावरती एनारी ( ता. वैभववाडी ) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासूर्ली वनपाल व त्यांच्या टिमने अवैद्य खैर लाकडाची वाहतूक करताना पकडले.

मानेवाडी येथील एका वाहनचालकाला हाताशी धरून ही टोळी दुर्मीळ वनौषधीसह झाडांची चोरून वाहतुक करत असल्याची माहिती वनविभागाला आठवडाभरापूर्वी मिळाली होती. या माहितीवरून म्हासुर्ली वन विभाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री हा सापळा लावला. त्यावेळी दोघा आरोपीसह एक लाख तीन हतार तीनशे सव्वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

केळोशी व म्हासुर्ली या संरक्षित वनामधुन विविध अशा दुर्मीळ वनौषधीसह कांही वृक्षांची कत्तल होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यासाठी वैभववाडी तालुक्यातील एक टोळी स्थानिक लोकांना पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत होती. याची माहिती गोपनीय सुत्राकडून वन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री २ वाजता वनविभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईत मानेवाडी ( ता. राधानगरी) येथील लहू रामचंद्र माने या वाहनचालकाच्या महिंद्रा मार्शल  गाडीत बिगरपासचे खैर वनस्पतीचे लाकूड सापडले. या गाडीतील खैर वनस्पतीचे 1.00 घमी जळावू लाकूड मालासह वाहन जप्त करून ताबेत घेतले. प्रकरणी आरोपी लहू रामचंद्र माने (रा.कोते पैकी मानेवाडी) व  लाकूड मालक रामचंद्र साईल (रा.एनारी, ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१(२) अनवंये प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र टी१/२०२१ नुसार राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी नोंदविला आहे.

ही कारवाई आर. एस.तिवडे, वनपाल म्हासुर्ली,  दिनेश टिपूगडे, वनरक्षक म्हासुर्ली, शिवाजी कांबळे, जोतिराम कवडे, संतोष करपे यांचेसह उमा जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास आर. एस. तिवडे, वनपाल म्हासुर्ली हे वनक्षेत्रपाल एस. बी. बिरासदर यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

फोटो ओळी =मानेवाडी -धामोड( ता. राधानगरी ) रोडवरती अवैद्य खैर वाहतुक करणाऱ्या वाहनचालक व व्यापाऱ्यांवरती कारवाई करताना वनपाल आर .एस. तिवडे , इतर कर्मचारी

Web Title: Illegal Khair transport gang caught in Forest Department trap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.